मंदिर

अमृतेश्वर गणेश मंदिर
केशवनगर, मुंढवा, पुणे–36
केशवनगरचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री. अजित केशवराव गायकवाड पाटील यांनी 1 गुंठा जमीन मंदिरास देणगी दिली. सार्वजनिक पैसा, वर्गणीतुन मंदिराची उभारणी केली. खाली तळघर असुन गणेश प्राण प्रतिष्ठा त्याच्यावर मंदिर बांधुन केलेली – प्रत्येक सभासदाकडुन यथाशक्त्ी वर्गणी गोळा केली – सर्व साधारणपणे एकुण 450 ते 500 सभासद केशवनगर मधील एकमेव मंदिर बोल्हाई मित्र मंडळ ट्रस्ट स्थापना.
दगडुशेट हलवाई गणपती टं्रस्ट चे अध्यक्ष श्री. प्रतापराव गोडसे (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मुर्ती तयार करुन घेतली. मंडळातील गरजु गरीब विद्याथ्र्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येते, मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. श्री. ह. भ. प. चांदगुडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात धार्मिक कार्यक्रम राबविले जातात.
मंडळाचे अध्यक्ष – श्रभ्. अजित केशवाल गायकवाड
उपाध्यक्ष – श्री. विलास बापू जाधव

पुजा सकाळी 6.00 वाजता संध्याकाळी 8.30 वाजता
चतुर्थी – अभिषेक केले जातात.

स्वर साधना कला मंच म्हणजे हौशी कलाकार या मंचाच्या वतीने गावात गावाबाहेरील भावगीत – भक्त्ीगीते, गितांचा कार्यक्रम, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा विविध पंसगी 250 हुन अधिक कार्यक्रम केले आहेत. स्थापना – 2003
मंचामध्ये एकुण 10 सदस्य आहेत. अध्यक्ष – आनंद चांदगुडे आहेत.

।। श्री ।।
ह. भ. प. बाळकृष्ण महाराज पारमासे यांचे मनोगत
दि. 6/6/08

वास्तविक पाहता मी मुळचा राहणारा वहाडचा दिनांक 24/9/1937 या तारखेस वरोली, ता. मानेरा (मंगरुळपीर) जिल्हा वासीक, या लहानशा गावी जन्म झाला, असुन माझे नांव बाळकृष्ण गणपतराव पाटमासे. कुटूंब मोठे आणि प्राप्ती कमी, त्यामुळे सकाळी संध्याकामळ जेमतेम हाता तोंडाची गांठ पडेल अशी आर्थिक परिस्थीती असल्यामुळे माया शिक्षणावर दुर्लक्ष. मी लहान वयांतच शेतमजुरी करित होतेा. वडील लेाहारी, सुतारी आणि शेतकी करीत होते. मला शिक्षण शिकुन मोठे व्हायची हौसी होती. वयाच्या बाराव्या वर्षी कुटूंबातून वेगळा झालो आणि बोर्डींगची व्यवस्था असलेली विठोली या गावची शाळा गाठली. तिथे सुमित्रा बाई ठाकरे, ना. क. ठाकरे गुरुजी आणि मानकर गुरुजी यांनी बोर्डींगचे जेवण आणि शिक्षण विनामुल्य देण्यात येते होते. धान्य गोळा करणे, पैशाचा हिशोब ठेवणे, इमारतीची व्यवस्था ठेवणे, सर्पणे फोडणे, दळण दळुन आणणे, इ. कामे. करावी लारगत असे. या व्यतिरीक्त् लागणारा खर्च जसे कपडे, पुस्तके, वहया या साठी सुटीच्या दिवशी आसपासच्या गावी, भांयावर सायकल वर आणि मनगटी घडया?ळावर नावे टाकुन पैसे मिळवित असे. या कामी माझी शिक्षणाची तळमळ लक्षात होवुन लोक मला वास्तविकतेपेक्षा जास्त पैसे देत होते. अशाच परिस्थितीत इयत्ता 9 वी आणि एस. एस. सी. या शिक्षणासाठी गिरजगाव (पांढरी) ता. दारव्हट जि. यवतमाळ ही शाळा गाठली व पुर्वीचा अनुभव पाहुन 150 विद्यार्थी असलेले बोर्डींगचे काम मला देण्यात आले. तिथे 1960 साली एस. एस. सी. या सेकन्ड क्लास मध्ये पास झालो. आणि कॉलेज करिता अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथे बोर्डींगची मजुरी वजा कामे करुन शिक्षण घेणे व पोट भरणे ही कामे करीत असताना 6/8/1962 या तारखेस नागपूर या ठिकाणी सर्व प्रकारच्या शारिरीक व शैक्षणिक अटी व परिक्षा पास करुन भारतीय सेनतेतील इंजिनिअर कोअर मध्ये क्लार्क हया व्यवसायीक या परिक्षेत व शारीरीक व तांत्रिक शिक्षण घेवुन भारतीय भुदलाचा सैनिक क्लार्क या पदावर देश सेवा करु लागलो.

माझे वडील पौराणिक होते, त्यामुळे आमच्या घराण्यामध्ये निरामिव्हता (शुध्द शाखाहारी पणा) कटाक्षान पाळला जात होता आणि  तीच प्रथा मी वयाचे एकुण 22 वर्षे सैन्यात असतांना कटाक्षाने पाळली म्हणुन माझे सैनिक बांधकव आणि अधिकारी मला मो ठया मानाने ‘‘पंडीतजी’’ या नावाने ओळखत होते. त्यानंतर मी संस्कृतचा अभ्यास करुन व गीता प्रेस गोरखपुर या ठिकाणाजुन प्रकाशित होणाया ‘‘कल्याण’’ या मासिकाचा आधार घेवुन खुप अभ्यास केला. ठिकठिकाणच्या भाषा आणि संस्कृती शिकुन प्रवचने करु लागलो. त्या मुळे पारमार्थिक क्षेत्रात मान मिळु लागला.

एकुण 22 वर्षाच्या कालावधी मध्ये 12 वर्षे भारतीय सिमेवर तर 10 वर्षे शांततेच्या ठिकाणी मध्ये देश सेवा करण्याचा योग आला आणि शेवटी पुणे येथील चिफ इंजिनिअर पुणे झोन पुणे येथे सेवारत करताना आॅनररी नायक सुबेदार या पदावर असातना सेवा निवृत्त झालो.

मिलीटरी सेवेतील कामकाजाचे रिपोर्ट अतिशय उल्लेखनीय (म्गवउचसवतल) असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला विनासायास सेवायोजना कार्यालय पुणे येथे लिपीक या पदावर सामावुन घेतले. तिथे सुध्दा एकुण आकारा वर्षे राज्य सेवा करुन 1995 साली सेवानिवृत्ती मिळाली. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे श्रवण भक्तीचा जास्तीत जास्त वाढ होवुन एकुण आळंदी ते पंढरपुर अशी 21 वर्षे पायी वारी करण्याचा योग माया जीवनामध्ये घडुन आला. पुण्याच्या संस्कृतीमुळे मला वहाड सोडुन पुण्यातच स्थायी होण्याचा मोह मला आवरता आला नाही. गेली 15 वर्षापासुन पुणे पंचक्रोशीमध्ये ठिकठिकाणी सामुदायीक सप्त्याचे आयोजन करुन त्या ठिकाणी काटेकोर पणे व शिस्तबध्द व्यासपिठ सुत्र संचालन करुन शक्य तेवढे जास्त समाज प्रबोधन करण्याचे कार्य गेली 15 वर्षापासुन चालु आहे. गेली तीन वर्षापूर्वी चंदन नगर येथील सुदंराबाई मराठी शाळेमध्ये 1500 विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचे ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ सुत्रसंचालन करुन श्री. मदभगवदगीता आणि ज्ञानेश्वरी अगदी स्पष्ट रत्या कशी वाचावी याचे प्रबोधन विद्याथ्र्यांना करुन दिले. त्या काया्रची रुपरेषा आणि इतर ठिकाणी दिर्शनात आलेला सेवाभाव लक्ष्ज्ञात घेवुन स्वामी समर्थ मंंदिर वडगांव शेरी गणेश नगर या संस्थेने 2002 चा ‘‘भक्ती प्रसार सेवा पुरस्कार’’ देवुन शाल श्रीफळ आणि मानधन देवुन पुरस्कृत करण्यात आले आहे.

गेली 5 वर्षापासून वाल्मिकी रामायणाचा अभया करुन वेळ प्रसंगानुरुप ठिकठिकाणी रामायणावर प्रवचने करुन रामकथे व्छारे समाज प्रबोधन करण्याचे काम सध्या चालू आहे. ‘मरावे परी किर्ती रुपे उरावे’ या भावनेने प्रेरित होवुन, गेली 10 महिन्यापासुन श्रीधर स्वामींच्या रामविनय या ग्रंथावर भाष्य लिहीण्याचे काम आता हाती घेतले असुन त्या लिखानाचे चाळीस पैकी चाळीस अध्याय आता भगवतकृपेने पूर्ण झाले. असुन आता त्या गं्रथाच्या छपाईचे काम होणे आहे. तात्पुर्वि भाषातज्ञ व्यक्ती कडुन व्याकरण दृष्टया शुध्दीकरण करण्याचे काम चालू आहे. नामा म्हणे केशीराजा केंव्हा नेम चालती या न्यायाने अपेक्षित ‘‘रामविजय’ ग्रंथ सोपान (सार्थ) हया ग्रंथाचे प्रकाशन झाल्याशिवाय भगवंताने मला देवाज्ञा करण्याचे मनात आणु नये अशी भगवंताच्या चरणी अपेक्षा आहे.

मी स्वत:मध्ये रुनवलेला परमार्थ व त्या पासुन मला झालेलेल समाधान अवर्णनीय आहे तो आनंद वेगळाच आहे. तोच आनंद इतरांनाही प्राप्त व्हावा त्याच्या जीवनांमध्ये सु–संस्कृत ता यावी या अपेक्षेने मी बयाच शाळा प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि संताचे वाडमयाची गोडी, सामुदायिक पारायणाच्या माध्यमाने शाळकरी मुला–मुलींना लावावी अशी सद्भावना कुठल्याही प्रकारची आर्थिक निरपेक्षता दाखवुन व्यक्त केली, परंतु अनेक प्रारची ता​िंत्रक कारणे दाखवुन अनुकूल प्रतिसाद न देण्याची त्यांची तयारी दिसुन आली असल्याने माया अपेक्षांचा भंग झाला व आता यापुढे अशा भानडीत पडणे योग्य ाही असा निर्णय घ्यावा लागला.

आठवडयातुन एकदा सुट्टीच्या दिवशी दोन तास शाळेचा एका हॉलमध्ये संस्कार वर्ग घेवुन इयत्ता सातवी ते दहावीे वर्गातील स्यंस्फूर्त मुलांना ज्ञान प्रबोधन करावे व त्या माध्यमाने त्यांना संस्कृत भगवतगितेची संस्था देवुन त्यांचे पाठांतर करुन घेवुन त्यांच्यात स्पर्धा आणि चुरस निर्माण करावी, अभंग, ओवी, श्लोक, छंद, भारुडे, चौपायी पाळणे, भुपाळया, याग्य त्या सापं्रदायीक चाली शिकवाव्या अशी माझी उत्कट अपेक्षा होती. परंतु समाजाकडुन योग्य तो प्रतिसाद न मिळाल्या मुळे मला गप्प बसावे लागले याची मला खंत वाटत आहे. त्या ऐवजी आता मंंदिरा मंदिरा मध्ये ग्रंथ वाचन आणि निरुपणाचे आयोजन करुन वयोवृध्द पुरुषांना प्रबोधन करण्याचे कार्य करुन समाधान मानावे लागत आहे. ही स्पष्टोवक्ती व्यक्त करतांना मनस्वी खेद होत आहे.
तुका म्हणे आता आईका सावधान ।

त्याजुनिया जन भक्ती करा, येवढेच मात्र खरे आहे. यासाठी वरीष्ठ कार्यालया माफ‍र्त प्रभावी आदेश महाराष्ट्रातील शाळा प्रमुखांना आणि प्राध्यापकांना होणे फार गरजेचे ओ. असे मला वाटते